मी आणि टकलू सैतान

  • 7.3k
  • 1.9k

मी आणि टकलू सैतान...... संध्याकाळचे चार वाजले होते. दिवसाभराची कामे उरकत आली होती. आता तासभरातच निघायचे होते. पुढे आठवडाभर सुट्टी टाकली होती. या सुटीत मात्र घरी निवांत आरामच करायचा असेही मी ठरवून टाकले होते. सुटीवर जायच्या उत्साहातच मी हातातले काम संपवले. आता आठवडाभर घरी काय मजा करायची या स्वप्नात नकळतच मी मा‍झ्या खुर्चीवर बसल्या बसल्याच हरवून गेलो. पण मी स्वप्नात हरवायला आणि साहेबांनी त्यांच्या केबिनमध्ये बोलवायला नेहमी कशी एकच वेळ सापडते हे मला न उलगडलेले कोडे आहे. त्यामुळेच ऑफिसच्या वेळात ऑफिसातील कोणत्याही माणसाने वैयक्तिक आनंदात हरवून जाऊ नये अशी जणू नियतीचीच इच्छा असावी असे माझे ठाम मत झाले आहे. म्हणूनच