धुक्यातलं चांदणं ....... भाग १३

  • 9.2k
  • 5.6k

विवेक आला मानसीकडे. ओळखीचं घर. पहिला तो कितीवेळा इकडे यायचा. आठवणी ताज्या झाल्या एकदम. कॉलेजमधून सरळ ते इकडेच यायचे कधी कधी.दुपारी आला कि रात्रीचं जेवण करूनच विवेक निघायचा घरी. मानसीच्या आई-वडिलांना त्या दोघांची मैत्री माहित होती. ते दिवस किती छान होते ना, किती धम्माल करायचो आम्ही. उगाचचं हसायला आलं त्याला. त्याने दारावरची बेल वाजवली. कोणीच दरवाजा उघडला नाही. "बहुतेक कोणी नसेल घरात."स्वतःशीच म्हणत विवेक निघाला. तेव्हा मागून एक कार येताना दिसली तसा तो थांबला.कार मधून मानसी बाहेर आली."Hi विवेक, कधी आलास?",मानसीने आल्याआल्या विचारलं."आत्ताच आलो , घरात कोणी नाही म्हणून निघालो परत.","हो… रे, जरा बाहेर गेली होती, call करायचा ना मला