पहाटे तो तिच्या खूप आधी उठला होता . कॉफीचा दरवळ घरभर पसरला होता . भांडण म्हणजे आपल्या जीवनप्रवासात काल्पनिक असा एक मैलाचा दगडच असतो . आपण भांडण करून सहज तर मोकळे होवू शकत नाही . एकतर खोल चिंतनात बुडून जातो नाहीतर त्यापासून नवीन सुरवात तरी करतोच .त्या दोघांतही रात्री असच कडक्याच भांडण झालं होतं . किचन मध्ये कॉफीच्या दरवळत्या सुगंधासह भांड्याच्या आदळआपट केल्याचा आवाज बेडरूममध्ये झोपलेल्या अर्पिताच्या कानामध्ये घुमत होता . त्याच आवाजाने तिला जाग आली . पहाटे पहाटे ही काय आदळआपट लावली सुयोगने म्हणून तिने चकार दुर्लक्ष करत बेसिंग गाठलं . हातात ब्रश घेतला आणि आरश्या समोर उभी राहून ती ब्रश