हाय निखिल, कसा आहेस?? चिडलास ना माझ्यावर न सांगता गेले म्हणून? एकदा तरी भेटायला पाहीजे होते ना?? मलाही असेच वाटत होते. खूप वाटलं तुला भेटावे, तुझ्याशी बोलावे. पण मनाला खूप समजावले आणि न भेटताच गेले. खूप प्रेम करतोस का रे माझ्यावर?? हो ना?? असा दचकू नकोस. मी न कळण्याइतपत बुद्दू नाहीये? खूप इच्छा होती तुझ्या तोंडून ऐकायची. पण आयुष्याने इतक्या जखमा दिल्यात की आता प्रत्येक गोष्ट करताना हात मागे होतो. प्रेम, नाती या गोष्टींमधला खरं सांग तर माझा विश्वासच उडाला आहे. अर्थात एक नातं खोटं निघालं म्हणजे सगळीच नाती खोटी, फसवी असतील असं नक्कीच नाही. आठवतं निखिल आपली भेट कशी