बकुळीची फुलं ( भाग - 11 )

  • 8.3k
  • 1
  • 2.9k

काळोखातलं प्रखर चांदणं आणि मंदमस्त वारा ह्या निसर्गी निर्मित वातावरणाचा मिलाफ म्हणजे स्वर्ग सुखं उपभोगल्या सारखं वाटू लागतं..... निर्विकार थंड वारा अनुजच्या देहाला भेदत होता... दुपार पर्यंत काय पावसाची सततची रिपरिप चालू होती , आणि आता बघा अवकाशात चांदण्याचा सडा... लुकलुकणाऱ्या चांदण्याकडे बघत अनुज एकांतात स्वतःशीच गप्पा मारत टेरिसवर उभा होता . हातातला कॉफीचा मग ठेऊन त्याने खिशातून फोन काढला आदितीला कॉल करू का ? नाही नको , ... असं म्हणत त्याने खिश्यात फोन ठेऊन दिला . खरचं येईल का ती ? की जाईल ह्या खेपेलाही तशीच न सांगता निघून.... दोन , तीन दिवस तशीच निघून गेली... आदितीला अनुजचा