निखिल सकाळी ६.३० ला ऑफिसपाशी पोहोचला. थोडीफार लोक आधीच येऊन थांबली होती. एक-एक करत सगळे येऊन निघायला ७.३० वाजले. इतके दिवस प्रचंड काम केल्यानंतर शेवटी तो दिवस येऊन ठेपला होता. आज ऑफिसची ट्रीप होती. एक आठवडा मस्त मौज करायची, कामाची कटकट नाही, तारखांचे गणीत नाही की मीटिंग्ज ची कंटाळवाणी बडबड नाही. आठवडाभर मस्त आराम आणि धिंगाणा. गप्पा, गाणी, ओरडा-आरडी यामध्ये अलिबाग कधी आले कळलेच नाही. अथांग पसरलेला समुद्र किनारा पाहून सगळ्यांचाच प्रवासाचा थोडाफार आलेला शीण निघून गेला. आणि राहण्यासाठी घेतलेले हॉलिडे-रिसॉर्ट पाहून तर त्यांच्या आनंदाला पारावर उरला नाही. सगळेजण आनंदाने बेभान झाले होते.संध्याकाळी समुद्रकिनाऱ्यावर दंगा-मस्ती, पाण्यात डुंबून सगळेजण