भेट ?

  • 8.4k
  • 1
  • 3k

भेट ? आई निघते ग ! आणि हो आज मी शेखरसोबत खरेदीला जाणार आहे. उशीर होईल. रात्रीचं जेवण बाहेरच करु मीनल. अग! मीने ऐक तर, येतांना बाबांच औषध घेऊन ये. तसं आहे दोन दिवसांच. वेळेवर धावपळ नको आठवणीने घेऊन ये. आई. हो ग येते आता... म्हणत मीनल घाईत निघाली.आज ती खूप आनंदात होती. ऑफिसला हाफ डे टाकला होता. ठरल्याप्रमाणे लंचब्रेकमधे शेखर घ्यायला येणार आणि साखरपुड्याची खरेदी करायची या विचारात मग्न ती ऑफिसमधे पोहचली. कामात वेळ कसा गेला कळलंच नाही. मीनलने फाईल्स कपाटात टाकत शेखरला मिसकॉल दिला. आज बाहेर जायच म्हणून डबा घेतला नव्हता. तेवढ्यात रमा आणि मंजिरीने तिला आवाज दिला. शेखर येईपर्यन्त आमच्यासोबत बस