दंतनिर्मूलन

  • 7.2k
  • 2.8k

** दंतनिर्मूलन ** त्यादिवशी सकाळचा चहा घेण्यासाठी मी सज्ज झालो असताना बायकोने ग्लासभर पाणी आणि चहाचा कप समोर ठेवला. मी पाण्याचा ग्लास उचलला परंतु तो नेहमीप्रमाणे थंडगार लागला नाही म्हणून मी पत्नीकडे पाहिले. माझ्या कटाक्षाचा अर्थ जाणून ती म्हणाली,"अहो, असे काय पाहता? तुमची दाढ दुखतेय ना म्हणून फ्रीजमधील पाणी दिले नाही.""अग, तुला माहिती आहे, मला बारा महिने अठरा काळ फ्रीजमधलेच पाणी लागते ते. शिवाय चार दिवसांपासून गोळ्या चालू आहेत, तेव्हा आता काहीही त्रास होणार नाही. आण.""तुम्ही नाही ऐकणार तर..."