लेख-रक्षाबंधन -बंधन नव्हे -स्नेहबंधन ----------------------------------------------------------आपल्या सांस्कृतिक जीवनास संपन्न बनवणारे आपले सणवार आणि दिन-विशेष यांचे महत्व कालातीत आहे ,या आधीच्या पिढ्यांनी या सणांना खूपमहत्व दिले ,त्याचे कारण त्या वेळच्या सामाजिक वातावरणात अशा प्रकारच्या सणवार साजरे करण्यामुळे सामंजस्य आणि सलोखा यांच्यात सुरेख असा समन्वय साधणे शक्य झाले .आजच्या आधुनिक जीवन शैलीतील नव्या पिढीला आपल्या संस्कार -मुल्या संबंधी माहिती करून देण्याचे फार मोठे कार्य आजची जेष्ठ पिढीला करणे भाग आहे . तरच आपल्या प्राचीन आणि उच्चतम अशा सांस्कृतिक वैभवाचा वारसा आपण आपल्या नव्या पिढीला देऊ शकलो तर आपण आपले जबाबदारी सार्थ पणे पार पाडतो आहोत हे समाधान आपल्याला नक्कीच लाभणार आहे.वर्षा-आगमनाने धरतीवर हिरवाई अवतरलेली असते, वातावरणात एक