आजा गुन्हा कर ले (भाग-२)

(14)
  • 6.3k
  • 1
  • 2.9k

“वॉस्को..वॉस्को..वॉस्को..वॉस्को..”“पणजीम..पणजीम..पणजीम..पणजीम..पणजीम..” बसचालक, खाजगी वाहतुकदार, टॅक्सीवाल्याच्या आवाजाने गोव्याचा स्टेशनपरीसर गजबजला होता. काळरात्र ओसरली होती आणि सुर्याची सोनेरी किरणे गोव्याच्या निळ्याश्यार समुद्राला चमकवुन टाकत होती. कालच्या रात्रीचे आमचे ते विद्रुप मुखवटे अंधारात विरुन गेले होते आणि आम्ही गोव्यात आलेल्या असंख्य पर्यटकांपैकीच एक होऊन गेलो होतो. दिन्याने यावेळेस एक बऱ्यापैकी हॉटेलपाशी गाडी थांबवली..“दिन्या.. अरे लय महाग वाटतेय हॉटेल.. परवडायचे नाय..” दिन्याला म्हणालो..दिन्या परत एकदा तस्साच भयानक हसला आणि त्याने जाकीटाच्या खिश्यातुन पैश्याची पुडकी काढुन माझ्यासमोर फेकली..“दिन्या.. इतके पैसे?? कुठुन आणले..” मी चाचरतच विचारले..“काल त्या म्हाताऱ्याला टपकवला ना.. त्याच्या खोलीत कॅश-पेटीची किल्ली होती.. म्हणलं इझी-कॅश… कश्याला सोडा..उचलली..” दिन्या बेफीकीरीने म्हणाला.. “शिवाय ते बघ वर