AGENT - X (10)

  • 5.6k
  • 3k

१०. "मला वाटलेलं तुम्ही शॅम्पेन पाजून हजारेला मारताय...!" मी सुन्न होऊन बोललो."वेडायस की काय? एवढी महाग शॅम्पेन मात्री कोण करणार? बिसाईड्स, आय नेव्हर युज माय ट्रिक ट्वाईस! पकडलं जाण्याची शक्यता असते!"मला माहितीय मिस्टर वाघ पित नाही. पण मला चिडवण्यासाठी तो उपहासानं तसं म्हणायला होता..."हजारेचा खून झालाय म्हंटल्यावर इन्वेस्टीगेशन झालं असेल?" "हो.""मग तुम्ही वाचला कसे?"यावर तो हसला. "तुझ्या लक्षात आलं असेल, तर याचं उत्तर दिलंय मी तुला." तो म्हणाला."बरं. पण त्याचे अकाऊंट स्टेटस तपासलं असेलच. त्यांनी मरणाआधी तुम्हाला एवढी मोठी अमाऊंट ड्रान्जॅक्ट केल्याचं समोर आलं असेल...""तो असले ड्रान्जॅक्शन्स करण्यासाठी त्याच्या बायकोचं अकाऊंट वापरायचा. ती एका श्रीमंत घरातली मुलगी आहे. त्यामुळं मोठी रक्कम तिच्या अकाऊंटवर