शेपूट असणाऱ्या प्राण्यांची सभा शहरापासून काही अंतरावर एक हिरवेगार जंगल होते. तिथे राखलेली नानाविध प्रकारची झाडी फुला-फळांनी बहरली होती. जमीनीवर सर्वत्र पसरलेले मऊशार गवत अनवाणी फिरणारांच्या पायाला गुदगुल्या करीत असे. ते जंगल तसे जवळ असल्यामुळे माणसांनी नेहमीच गजबजलेले असे. विशेषतः सायंकाळी तिथे भरपूर गर्दी असायची. त्यादिवशीही सकाळी सकाळी त्याठिकाणी भरपूर गर्दी होती. परंतु ती गर्दी माणसांची नव्हती तर खास अशा प्राण्यांची होती. तसे त्या जंगलात राहणारे ते प्राणी असले तरी त्यातले काही प्राणी त्यादिवशी मुद्दाम एकत्र येत होते. त्या त्यांच्या 'गेट टुगेदर' या कार्यक्रमाला त्यांनी