दुधायण

  • 8.8k
  • 3.1k

दुधायण ! त्यादिवशी सकाळी नेहमीप्रमाणे वर्तमानपत्र वाचत असताना एका बातमीने माझे लक्ष वेधले. बातमी वाचय असताना मी स्वयंपाकघराकडे पाहून आवाज दिला,"अ..ग, ए... लवकर ये.""असं ओरडायला काय झालं?" चहाचे कप घेऊन आलेल्या सौभाग्यवतीने विचारले. "काय भयंकर बातमी आहे. ऐक. बायकोने तापायला ठेवलेल्या दुधावर लक्ष न दिल्यामुळे दूध ऊतू गेले. त्यामुळे चिडलेल्या, संतापलेल्या बायकोने स्वतःच्या नवऱ्याला चक्क दोन दिवस उपाशी ठेवले..." मी ती बातमी घाबरलेल्या अवस्थेत वाचत असताना बायको खळाळून हसत 'ऐकावे ते नवलच' असे