८.एकाचवेळी दोन ठिकाणी लक्ष ठेवता येणार नाही म्हणून मिस्टर वाघनं मिलींद हजारेला निशांत पुरोहितवर लक्ष ठेवण्यासाठी सांगितलं. "आणि तुमच्या माणसाला कामाला लावू नका! तुम्ही पर्सनली त्याच्या मागावर रहा!" मिस्टर वाघ हजारेला म्हणाला."पण का? इज ही अ परपेट्रेटर्?" हजारेनं विचारलं."कळेल लवकरच!" मिस्टर वाघ गंभीरपणे म्हणाला."आणि तुम्ही काय करणाराय?" "दुसरं एक काम आहे!" "मिस्टर वाघ! माझं जर काम झालं नाही, तर तुम्हाला खूप महागात पडेल एवढं ध्यानात ठेवा! तुम्ही काही काम करताय, असं मला तर वाटत नाही! आताही तुम्ही मलाच कामाला लावताय! एवढे पैसे तुम्ही घेतलेत ते कशासाठी?" हजारेनं मिस्टर वाघवर चिडून त्याला सुनावलं."तुम्हाला माझी वर्किंग प्रोसेस पटत नसेल, तर तसं सांगा. मी आत्ता ही