एक्स्ट्रामॅरीटल अफेअर - एक कथा

  • 10.5k
  • 4k

सकाळचे सव्वा दहा वाजले होते.सूर्याच्या कोवळ्या किरणांने आय.टी पार्क मधील ती काचेची ती नऊ मजली इमारत उजळून निघाली होती.जिगसॉफ्टचे ऑफिस त्या इमारतीच्या सहाव्या मजल्यावर होते.पंधरा मिनिटांने मॉर्निंग शिफ्टचे काम सुरु होणार होते .अनिशच्या टीम मधले जवळ-जवळ सगळे आले होते.अनिशने आपल्या कम्प्युटरमध्ये लॉग इन करून ठेवले अनो तो लॉक केला.मग तो कॉफी आणायला कॉफी मशीन पाशी गेला .त्याने कॉफी मशीन वरील लाते समोरचे बटन दाबले.कॉफीचा वाफाळलेला मग घेऊन तो परत निघाला.डाव्या हातात घातलेल्या मनगटी घड्याळात त्याने किती वाजले ते पहिले. ऑनवर्क जायला अजून दहा मिनिटे बाकी होती.तो रम्याच्या बे मध्ये आला ती एकटीच तिथे होती बाकी अख्खी बे मोकळी होती.ती बसते