बकुळीची फुलं ( भाग - 4 )

  • 8.1k
  • 1
  • 3.4k

" विपिन आता कुठे असेल रे ? " आदितीचं हे वाक्य ऐकताच अनुज भूतकाळाच्या गर्देतुन बाहेर पडला . " तुला आजही आठवण येते का ग त्याची ? " , " हो , मित्र म्हणून .... तू समजतो तसं काही नाहीये , माझं मन त्याच्यात कधी गुंतलच नाही . तो माझ्यासाठी खूप जवळचा मित्र होता त्यापलीकडे काहीच नाही . त्याचा तो हसरा विनोदी स्वभाव आठवला की वाटतं आजही तो आहे आपल्यात . तुला ठाऊक आहे ना अन्या , विपिन कधीच कुणाला sad मूड मध्ये दिसला नाही . कोणी दुःखी असलं की त्याला पोटधरून हसवायचा तो . प्रेम म्हणून नाही