धुक्यातलं चांदणं ..... भाग ७

  • 10.9k
  • 1
  • 6.8k

पुढचे २ दिवस , विवेक आणि पाऊस… दोघेही गायब. सुवर्णा त्याला call करत होती त्याला. तर मोबाईल switch off… कूठे गेला हा माणूस… शी बाबा !! काय करायचे याचे आता. सुवर्णा ऑफिसमध्ये बसून विचार करत होती. पूजाला विचारायचे का ? तिला काही contact केला असेल तर त्याने.… अरे हो… २ दिवस ती तरी कुठे दिसली. हे दोघे , पुन्हा फिरायला गेले कि काय ?… नसतील. कसला विचार करते मी. पण हा गेला कुठे नक्की. सुवर्णाचं लक्ष कुठे होतं कामात. संध्याकाळी, सुवर्णा ऑफिस मधून निघाली. पोहोचली स्टेशनला. ट्रेनमध्ये बसणार तेवढयात तिला आठवलं काहीतरी.… पूजू ,