पॅरिस - ७

  • 6.8k
  • 2.8k

घरी पोहोचलो आणि जरा वेळ विश्रांती घेऊन लगेचच आवरायला घेतलं. आजची संध्याकाळ स्पेशल होती. आम्ही आधीच प्लॅनिंग करून ठेवले होते. मुलं त्यांच्या मावशीबरोबर कुठल्यातरी मस्त हॉटेल मध्ये जेवायला जाणार होतो आणि मी आणि बायको पॅरिसमधला प्रसिद्ध ‘लिडो’ शो बघायला जाणार होतो. ‘लिडो’ हा कॅब्रे शो आहे पण ह्यामध्ये नृत्य करणाऱ्या मुली सेमी-न्यूड असतात. पूर्णपणे टॉपलेस. सोबत जेवण आणि शॅम्पेन. ह्यावेळची मेट्रो जरा किचकट होती. पहिल्या मेट्रो नंतरची दुसरी मेट्रो जी पकडायची होती त्याचा प्लॅटफॉर्म पहिल्या प्लॅटफॉर्मपासून काहीसा दूर होता. बरीच डावी-उजवी वळणं घेतल्यावर आणि काही जिने चढ उत्तर केल्यावर शेवटी सापडले आणि वेळेत आम्ही लिडोला पोहोचलो. टेबल अगदी स्टेजच्या जवळ