निकालाची परिक्षा - २

  • 5k
  • 1.8k

निकालाची परीक्षा – २ नाही नाही, असे काही शक्य नाही. येईल तो इतक्यात. - कुमुद आपल्या मुलाला कोणी पळवले आहे किंवा तो घर सोडून गेला आहे या दोन्ही कल्पना कुलकर्णी कुटुंबाच्या कल्पनेपालिकडच्या होत्या, त्यामुळे साहजिकच कुमुद अशी कुठलीही शक्यतासुद्धा नाकारत होती. अहो मॅडम काळ बदलला आहे आता. अशा खूप केस बघितल्या आहेत मी. - पिंकीचे वडील. 'काळ बदलला आहे' हे स्वतःचे वाक्य स्वतःच अशा प्रकारे ऐकून सदा मात्र निरुत्तर झाला होता. परन्तु पिंकीच्या वडिलांना दुजोरा देण्याची जणू स्पर्धाच सुरु होती, प्रत्येकजण आपल्या ओळखीतल्या जणांचे असे प्रसंग वर्णन करू लागला होता. अहो परवाच आमच्या हास्य क्लब मधल्या एका गृहस्थाच्या नातवाने