०९ मे, २०१८ पॅरिसला आल्यावर सायकलिंग करायचेच हे आमच्या ‘टु-डु’ लिस्ट मध्ये होते. ‘बाईक अबाऊट टूर्स’ नावाच्या एका संस्थेशी ह्याबद्दल इथे येण्याआधीच बोलून ठेवले होते. ही लोक १५-२० लोकांचे छोटे ग्रुप्स बनवतात, त्यांना सायकली पुरवतात आणि पॅरिसचा काही भाग फिरवतात. साधारण ४-५ तासांची हि टूर असते. एक तर आम्ही सगळे सायकल-वेडे, इकडे पुण्यात खूप सायकलिंग करतो. पॅरिसला तर सायकलिंग मोठ्या प्रमाणात होते, त्यासाठी ट्रॅक्स पण आहेत बरेच, विचार होता सायकलवर फिरायला तर मजा येईलच, शिवाय बऱ्याच गोष्टी शोधाशोध न करता बघताही येतील. स्वातीताईला बुधवारी युनिव्हर्सिटीमध्ये लेक्चरर्स असतात त्यामुळे त्या दिवशी ती आमच्याबरोबर नसणार होती. सायकलिंग आणि फिरणे दोन्ही गोष्टी होऊन