शाळेच्या बस मधून टुणकन उडी मारताच अभेद्य साहेबांची पोपटपंची सुरु झाली."आई, टिचरनी आज आम्हला व्हेजिटेबल्स शिकवल्या.आई, आपल्या घरात आहेत ना व्हेजिटेबल्स? मला त्याची भाजी करू दे टिफिनला उद्या."अशी बडबड सुरु होती. त्याला शाळेतल्या घडणाऱ्या गोष्टी घरी आल्यावर सांगायची भारी हौस. ती सवय चांगलीच आहे. घरी आल्यावर मी त्याला विचारले "कोणत्या व्हेजिटेबल्स शिकवल्या टिचरनी?" त्याने स्कूलबॅग मधून पुस्तक काढून मला चित्रातून एकेक भाजीचे नाव सांगू लागला. मला गंमत वाटली. मी म्हणाले,"अभि तुला खऱ्या भाज्या कश्या असतात? त्या कश्या उगवतात? त्याला काय म्हणतात? त्या कश्या शिजवतात? हे माहिती आहे का?". अर्थातच नकारार्थी मान हलली. मग मी विचार केला कि आज आठवडी बाजारात