परमेश्वराचे अस्तित्व - ३

  • 10.2k
  • 3.2k

भौतिक जीवनात मनुष्य मन आणि इंद्रिय यांच्या आधीन होतो.भौतिक अस्तित्वातगुरफटून जातो. " मन एवं मनुष्याणां कारण बंधन मोक्षयो। बंधाय विषयासंगो मुक्तै निर्विषय मन:।।अर्थ:-मन हे मनुष्यासाठी बंधनाचे तसेच मुक्तीचेही साधन आहे,कारण आहे.इंद्रिया विषयीसंलग्न झालेले मन मुक्तीस कारणीभूत होते.म्हणून परमेश्वर चिंतनाला महत्व आहे.ज्याने मनाला जिंकले त्याच्या साठी मन हेसर्वोत्तम मित्र आहे.परंतु जो असे करण्यासअपयशी झाला त्याच्या साठी तेच मन परम शत्रूहोय. शरीर,मन आणि क्रिया यांचा नित्यनियमाने अभ्यास करून संयमित होऊन,कोणत्याही प्रकाराच्या भौतिक सुविधाप्राप्त करण्यासाठी साधना न करता परमेश्वरप्राप्तीसाठी कारावी.