दृष्ट लागण्याजोगे सारे... (कथा पूर्णपणे काल्पनिक आहे. पण आजकाल जवळ जवळ बऱ्याच ठिकाणी अशीच परिस्थिती असते.) तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं... तुझ्या माझ्या लेकरांना घरकुल हवं... डोळे मिटून बेडवर निवांत पडून गाणं ऐकण्याची मजा काही औरच असते. कुकर ची शिट्टी वाजली तशी नीता एकदम दचकून जागी झाली. मोबाईल उचलून पहिले तर ८ वाजले होते. आज सोमवार, नवऱ्याच्या डब्याची तयारी. तिचा नवरा किशोर... पलीकडच्या रूम मध्ये व्यायाम करत होता. रंगाने गहुवर्ण, सहा पावणे सहा फूट उंच, सिक्स पॅक नाही पण पिळदार शरीरयष्टी, धारदार नाक अन ओठांवर लहान पण छान मिशा. पुण्यामध्ये नामांकित आय टी कंपनीमध्ये उच्चपदावर कार्यरत. जास्त कुणाशी