पॅरिस – ३

  • 7.4k
  • 3.3k

०७ मे, २०१८ एअरपोर्ट वरचे फ्री-वायफाय पकडून सगळ्यांना व्यवस्थित पोचल्याचे कळवून टाकले. बाहेर कुठून पडायचे वगैरे बघत असतानाच शेजारी चालू असलेल्या जाहिरातींच्या होर्डिंगकडे लक्ष गेले. बेल्जीयम च्या ब्रुज गावाची काही चित्र त्यावर झळकत होती. हो, तेच बेल्जीयमचे चॉकलेटसाठी प्रसिद्ध असलेले ब्रुज. छोटे छोटे रस्ते, टुमदार घर आणि दुकानं, भली मोठ्ठी चर्च, सर्वत्र गर्द झाडी आणि ह्या सगळ्यांमधून वाहणारा कॅनाल. त्या कॅनाल मध्ये पोहणारी बदकं, फुलांचे ताटवे.. “Wow.. is this for real?”,असंच काहीसं क्षणभर वाटुन गेलं. पटकन तिथलं ब्रोशर उचललं आणि बाहेर पडलो. काचेचं सरकतं दार उघडलं आणि गरम हवेचा एक झोत अंगावर आला. मी आणि बायकोने चमकून एकमेकांकडे बघितलं. बॅगेतले