शंकर मुडकेचा बेचव चहा आणि तिखटजाळ सामोसा खाल्ल्याशिवाय आमच्या ऑफिसात कोणीच कामाला सुरवात करत नाही. तसा तो खाऊन आम्ही रोजच्या प्रमाणे आजही सुरवात केली. पण आज काहीसा वेगळाच दिवस होता. माझ्या टेबलवरला तो, कावळ्या सारखा काळाकुट्ट फोन केकाटला. हा लँडलाईन सेट सात वर्षा खाली घेतला होता. मालकाला तो लकी म्हणून अजून तसाच आहे. " नमस्कार,दैनिक दिनकर, बोला " मी यांत्रिकपणे बोलायला सुरवात केली. "चीफ एडिटर?""हा, बोलतोय.""काहो? मुंबईत म्हणे एक अशी टॅक्सी आहे जी तुम्हाला हवे त्या ठिकाणी नेत नाही, तर तुम्ही ज्या जागी हवे आहेत तेथे नेते!""अहो, अश्या अफवांवर विश्वास ठेऊ नका. अशी टॅक्सी कशी असू शकते का? ""नाही म्हटलं, तुम्ही पेपरवाले