गोष्ट...किंवा गोष्टी. आपण बऱ्याच जणांनी लहानपणी चिऊ काऊच्या, राजा राणीच्या, प्राण्यांच्या पक्ष्यांच्या गोष्टी ऐकल्या असतील. तुम्ही म्हणाल यात नवीन काय? आम्ही खूप गोष्टी आजी-आजोबांकडून ऐकल्या आहेत.पण गोष्टी सांगणे सुद्धा एक कला आहे. नुस्तीच हाताची घडी घालून गोष्ट कोणी सांगू लागले तर खूप बोअर वाटेल.गोष्ट..मग ती कोणतीही असो तिच्यात शिरून त्या गोष्टीतील पात्रे अभिनयाने, आवाजाने जिवंत करता यायला हवीत. तरच ती गोष्ट ऐकण्यात मजा येते आणि ती गोष्ट कायम स्मरणात राहते.आजच्या व्हर्चुअल जगात हातात मोबाइल, कॉम्पुटर, टॅब अशी साधने वापरून विविध सर्च इंजिने वापरून लहान मुलांसाठी गोष्टी ऐकवल्या जातात, दाखवल्या जातात. परंतु स्वतः आई बाबा किंवा घरातील वडीलधारी मंडळींनी हावभावासहित एखादी