उद्धव भयवाळ औरंगाबाद सुधाकर आणि त्याची बायको (विनोदी कथा)आमच्या कॉलनीमधील सुधाकर आणि त्याची बायको मंदा हे दोघेही आता घटस्फोटाच्या किनाऱ्यावर उभे आहेत हे आमच्या कॉलनीतील लहान मुलापासून तर मोठ्या माणसापर्यंत आणि लहान मुलीपासून तर मोठ्या बाईपर्यंत सर्वांना कळून चुकले होते. त्यामुळे त्या प्रत्येकाला आणि त्या प्रत्येकीला आता असे वाटत होते की, सुधाकर आणि मंदा आता कोणत्याही क्षणी घटस्फोटासाठी अर्ज करून एकमेकांपासून विभक्त होतील. म्हणूनच अलीकडे कॉलनीमधील बायकांना तिसऱ्या प्रहरी एकत्र आल्यावर चघळायला हा अगदी हलवायाच्या कढईमधील गरमागरम जिलबीसारखा अगदी ताजा आणि खुसखुशीत विषय मिळाला होता. सुधाकर आणि मंदा यांच्या लग्नाचा दहावा वाढदिवस नुकताच साजरा झाला होता; आणि त्याच्या काही दिवस अगोदरपासूनच