पॅरिस - १

  • 11.8k
  • 2
  • 5.6k

“काय मग? कसं होतं पॅरिस?”, नुकतीच पॅरिसला काही दिवस सुट्टी एन्जॉय करुन परत आल्यावर अनेकांनी विचारलं पॅरिस कसं आहे? हे एका शब्दात सांगणं कठीण आहे, खरं तर पॅरिस कसं आहे हे शब्दात सांगणंच कठीण आहे. पॅरिस हा एक अनुभव आहे आणि तो अनुभवायला हवा. तरी पण माझ्या परीने प्रयत्न करून बघतो… आपण आपल्या आयुष्यात अचानक एक्झीट घेणारी अनेक लोकं बघतो. “अरे! काल परवा पर्यंत तर चांगला होता की..” असं म्हणून आपण हळहळतो आणि आपल्या कामाला लागतो. श्रीदेवीच्या अकाली मृत्यूने आपण सगळेच हळहळलो आणि आयुष्य किती क्षणभंगुर आहे ह्याची पुन्हा एकदा जाणीव झाली. त्यावेळी पैसा, प्रसिद्धी काही कामी येत नाही.