युरोपियन हायलाईटस - भाग ३

  • 6.3k
  • 2.5k

वडूज वान्तन इन्सब्रुक स्वित्झर्लंड नंतर आम्ही लांचेस्टाईन येथे गेलो याची राजधानी आहे वडूज, जे स्विस बोर्डर वर आहे . एक अत्यंत छोटेसे गाव ज्याची लोकसंख्या फक्त ५४५० आहे . इथला कारभार राजाच्या अखत्यारीत चालतो .ह्या राजाचा राजवाडा उंच डोंगरावर आहे . तेथून संपूर्ण वडूज वर लक्ष ठेवता येते . गावाचा कारभार हा गावकरी आणि राजा यांच्या सामंजस्यानुसार चालतो . इथले स्वतंत्र असे चलन आहे . आणि मुख्य व्यवसाय वाईनरी आहे . त्यामुळे जागोजागी अनेक द्राक्ष मळे दिसतात . जगातली अत्यंत उत्तम अशी वाईन येथे बनते . एका छोट्या ट्रेन मधुन प्रवाश्यांना या गावाची सैर करवली जाते . छान छान छोटे