आता आर्या थोडी stable झाली होती. तिथल्या स्टाफ मधील एक सिस्टर ने येऊन सांगितले आता तुम्ही त्यांना जेवायला द्या काहीतरी.आर्या च्या आई ने तिला जेवण्यासाठी वाढले आणि त्या घास भरवत होत्या. आर्या खाऊन घे पटकन मग गोळ्या घ्यायच्या आहेत. तिची आई म्हणाली. सिद्धांत हे सगळं बाजूला बसून पाहत होता. आई प्लीज माझी काहीही खाण्याची ईच्छा नाही आहे. अग अस म्हणून कस चालेल ईच्छा नाही म्हणून कस चालेल काही तरी तर खावच लागेल, त्याशिवाय बर कस वाटेल. खा पटकन. आई तुला एकदा नाही म्हंटलेलं कळत नाही का ग का इतका आग्रह करत आहे मला नाही ईच्छा तर नाही, मी