To be or not to be?---- ए लेखक? एकच सवाल! कुणाला? तर आधी आमुच्याच मनाला, आणि मग तुम्हा वाचकांना! कस आहे मित्रांनॊ, एक माझा अजून 'मी'च आहे. 'मी'चा आदरणीय 'आम्ही' कोणी होवू देईल असे वाटत नाही, म्हणून या लेखा पुरता माझी मला मी 'आम्ही' करून घेतलाय. दुसरे लेखाची सुरवात मुद्दाम इंग्रजीत केली, हल्ली हे खूप गरजेचं झालाय. 'मायन्या पेक्षा मथळ्याच महत्व असते!' हि आमच्या गुरुची शिकवण. (गुरु?- -पु.ल. दुसरं कोण?) त्यात आम्ही 'इंग्रजी' हि, पदरची (फटका का असेना! शेवटी तो आमचाच पदर फटका असणारच कि!) भर घातलीय. लेखन, कितीही भुक्कड करा, शीर्षक मात्र इंग्रजीतच पाहिजे! त्या शिवाय लोक वाचत नाहीत