प्रलय - २०

  • 7.3k
  • 1
  • 3.5k

प्रलय-२०       महाराणी शकुंतलेपासून भक्तांनी   राजकुमारास घेतले .  तो राजकुमार त्यांनी ' त्याच्या '  ताब्यात दिला .  तो  तोच होता .  संपूर्ण शरीराभोवती काळे वस्त्र परिधान केलेला , विचित्र काळ्या पक्षावरती बसलेला .  त्याच्याभोवती सदैव काळ्या ढगांचे विचित्र आवरण असायचे .  बोटावर मोजण्याइतक्याच लोकांना त्याचा चेहरा माहीत होता .  त्यामध्ये महाराणी शंकूतलेचाही समावेश होता .  ज्यावेळी राजकुमार त्याच्या ताब्यात दिला . त्यावेळी भक्त त्याच्या मागोमाग निघाले .  मात्र त्या भक्तांमध्ये मिसळून उत्तरेच्या सैनिक तळ्यावरती उपस्थित असलेला अभिजीत अद्वैतही निघाला .  हा तोच अद्वैत होता ,  जो तीनशेजनांच्या तुकडीचा प्रमुख होता .  ज्या तुकडीला भक्तांनी काही दिवसांपूर्वी नष्ट केले होते