युरोपियन हायलाईटस - भाग २

  • 5.9k
  • 2.6k

नेदरलँड बेल्जियम नंतर आंम्ही निघालो नेदरलँड कडे ..ब्रसेल्सचा शेजारी असणारा हा देश असाच खुप देखणा आहे .याला हॉलंड पण म्हणतात ट्युलिपचा देश ..विन्सेंट चा देश ..आणि हो सायकलचा देश ...!! नेदरलँड आणि सायकल म्हणजे 'जनम जनमका’ साथ आहे . ही सायकल चालवायची पद्धत सगळ्याच युरोपीयन देशात आहे . प्रदूषण कमी होतं म्हणून इथं खूपजण सायकल चालवतात . सायकल घालवण्यात कमीपणा मानत नाहीत. चांगली शिकलेली उत्तम पगार असणारी माणसंही सूटबुट घालुन सायकल चालवतात . कार असतात पण कार्समागे सायकली बांधुन , कार्सवरही सायकली रचुन फिरतात . प्रदूषण कमी व्हावं म्हणून सरकार सायकलचा पुरस्कार करतं . महापौर पण सायकलने ऑफिसात जातात. रस्तेही