लहान पाणी माझ्या हातापायात थोडे बळ आल्यावर, आमचे अण्णा एखाद्या वेळेस म्हणायचे,"सुऱ्या, तो कोपऱ्यातील तबला घे बर, पाडू -बिडू नकोस!" मग मी डगमगत्या पायाने तो जडशीळ, हो तेव्हा तो जडच वाटायचा, तबला पोटाशी धरून त्यांना आणून देत असे. "शाब्बास, असाच तो डग्गा पण आण." अण्णा ,म्हणजे माझे वडील. हाच तो माझा तबल्याशी पहिला संपर्क! माझी हि तबला नेण्या -आणण्याची हमाली बरेच दिवस चालली. मी नऊ -दहा वर्षाचा होईपर्यंत. एक दिवस समोर तबला असताना अण्णा म्हणाले. "सुऱ्या, बस. " मी बसलो. "थोडी पावडर लाव. "मी समोरच्या डबड्यातली पावडर घेतली अन तोंडाला फसली. "गधड्या, तोंडाला नाही, बोटाना!"मी पुन्हा पावडर मध्ये बोटे बुडवली. "हा, म्हणजे काय कि बोट