भटकंती.. (सुरुवात एका प्रवासाची ) ........ (भाग १३)

  • 5.1k
  • 2.5k

आकाशने पुढचा रस्ता, सखाला विचारून बनवला होता. परंतु अर्धाच रस्ता सखाला माहित होता. फक्त त्याने सरळ जाण्यास सांगितले होते. रस्ता तसा सरळ नव्हताच. प्रचंड रानं होतं. झाडा-झुडुपातून वाट काढत जावे लागत होते. त्या गावाच्या मंदिराचा कळस तेवढा दिसला होता आकाशला. त्यावरून आकाशने एक अंदाज लावला होता. आज जेवढं अंतर पार करता येईल तेवढं पार करायचं. संध्याकाळ होण्याच्या आधीच कुठेतरी थांबायचे... कारण सखा बोलला असला तरी आज त्या गावात संध्याकाळ पर्यंत पोहोचणं शक्य वाटतं नव्हतं. हे त्याने सगळयांना बोलून दाखवलं. सगळ्यांना ते पटलं. " सगळ्यांनी पटापट पाय उचला... आज पोहोचू शकत नाही तिथे पण जास्त अंतर