अव्यक्त (भाग - 9)

  • 4.5k
  • 1.9k

सत्तर-ऐंशीच्या दशकातील मध्यमवर्गीय जाणिवांच्या जगात स्वत:ला कोंडून घेतलेल्या स्त्री-पुरुष दोघांनाही आकर्षित करणारं असं बाह्य़ तसंच आंतरिक जग गौरी तिच्या कथा-कादंबऱ्यांतून उभी करत होती. मनात इच्छा असूनही जे बंड त्या काळातील स्त्रिया करू  धजत नव्हत्या ते बंड गौरीच्या जवळजवळ सर्वच नायिका करत होत्या.ज्या वयात प्रश्न पडायला लागतात आणि आपण आपल्या स्वतंत्र अस्तित्वाविषयी विचार करायला लागतो त्या वयात गौरी देशपांडेच्या नायिकांशी आपली भेट झाली तर दिलासा मिळतोच, पण आपण योग्य मार्गावरून निघालो आहोत याविषयी खात्री वाटायला लागते. मला गौरी नेमकी अशाच एका वळणावर भेटली, जेव्हा माझ्या आत लपलेली व्यक्ती आजूबाजूच्या जगाकडे कुतूहलाने पाहू लागली होती. लिंगभावाचं राजकारण कळायला सुरुवात होण्याचा तो काळ