अव्यक्त (भाग - 8)

  • 5.1k
  • 2k

कुसुमाग्रजांनी ज्या काळात लिहायला सुरुवात केली तो काळ पारतंत्र्याचा काळ होता. त्या काळात लिहिली जाणारी कविता ही देशप्रेमानं प्रेरित झालेली होतीच पण त्याचबरोबर निसर्ग, प्रेम तसेच जीवनविषयक भाष्य अशा विषयांवर केंद्रित झालेली होती. कुसुमाग्रजांच्या बहुतेक कविता या अशा आशयाभोवती फिरताना दिसतात. कुसुमाग्रजांचा लेखनकाळ हा जवळजवळ साठ-सत्तर वर्षांचा. ‘जीवनलहरी’ हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह १९३३ मध्ये प्रसिद्ध झाला. तेव्हापासून जवळजवळ त्यांच्या मृत्यूपर्यंत म्हणजे १९९९ पर्यंत ते लिहीत होते. इतक्या प्रदीर्घ काळात सातत्यानं कसदार लेखन करणं ही साधी गोष्ट नाही. पण कुसुमाग्रजांना ती जमली.कुसुमाग्रजांनी कवितेबरोबरच नाटक, रूपककथा, लघुनिबंधही लिहिले. त्यांची कविता असो की नाटक त्यांच्या लेखनात मानवतावादाचं दर्शन आपल्याला सतत घडत असतं. त्यांची