प्रलय - १३

  • 7.8k
  • 3.6k

प्रलय-१३      मोहिनी त्या गरुडावरती बसून हवेत उंच उडत होती .  वाहणाऱ्या वाऱ्याबरोबरच तिचे केसही हवेत उडत होते .  ती कुठे चालली होती .....? तिलाही माहित नव्हतं .  तिची संवेदना जणू नष्ट झाली होती .  पूर्वीची मोहिनी आता राहिली नव्हती .  जणू तिचा नुकताच जन्म झाला होता .  बऱ्याच नवीन गोष्टी तिला आठवत होत्या . ज्या गोष्टी तिने कधीच अनुभवल्या नव्हत्या ,  त्या गोष्टी तिला आठवत होत्या.  आठवणी नव्याने लिहिल्या जात होत्या .    कोऱ्या पुसलेल्या पाटीवरती कोणीतरी अक्षरे लिहावीत त्या प्रमाणे तिच्या संपूर्ण  रिकाम्या झालेल्या मेंदू वरती आठवणीच्या आठवणी कोरल्या जात होत्या . तिला काहीच माहित नव्हते ,  पण