आकाश परतला तेव्हा संध्याकाळची उन्ह परतू लागली होती. घड्याळाचा काटा ६ वर आला होता. आकाश सुद्धा दमलेला होता. प्रथम तोही गावात जाऊन अंघोळ करून आला. थोडंसं खाऊन आणि रात्रीच्या जेवणाचं सांगून तो आपल्या tent मध्ये आला. सगळे त्याचीच वाट बघत होते. एवढंच कि सगळे वेगवेगळे, २-३ जण एका बाजूला निवांत गप्पा मारत बसले होते. " मिळाला का रस्ता तुला... सॉरी तुम्हाला. " संजना जीभ चावत म्हणाली. " मिळाला... उद्या निघू पहाटे... " आकाश सॅक एका बाजूला ठेवत म्हणाला. " बाकी सगळे जेवलात ना पोटभर... ","हो..","आणि तुमची friend... ती कुठे दिसत नाही ती... " आकाश आजूबाजूला बघत म्हणाला. " ती ना... ती बघा तिथे