सकाळी सकाळी सिद्धांत ला आणि आर्याला सोबतच जाग आली. आर्याने त्याच्याकडे पाहून smile दिली. बाहेर छान धुके होते. 'किती सुंदर आहे ना ही सकाळ! फार आवडतात मला ही धुके, थंडी. आपलं आयुष्य पण ह्या धुक्या सारखंच आहे. नाही का? म्हणजे पुढचं सगळंच खुप मोहक वाटतं, समोर काय आहे हे दिसत नाही पण चालायला लागलो की रस्ता पण आपोआप सापडतो.', आर्या म्हणाली. 'वा आर्या! खूप पुस्तकं वाचते का गं तू? नाही म्हणजे exact फिलॉसॉफी मांडली म्हणून विचारलं.' तिने थोडं रागानेच सिद्धांतकडे पाहिलं. 'sorry sorry!! अगं मला असं काही म्हणायचं नव्हतं. तू काही तरी चुकीचा अर्थ घेतीये. I am just saying, खरंच