आताच तुझं पत्र आलं बघ . तसा उत्साह संचारून आला . खरचं येशील पॅरिसला जून महिन्यात ? जमेल ना तुला यायला . तुझं नेहमीचं . विकेंड मध्ये भेटू ... प्रत्येक वेळेला प्लॅन फसतोच ह्या ना त्या महत्वाच्या कामात . की खुद्द तुला वाटतं मला न भेटावं ? असो , तुझं तुला ठावं . इथे आल्यापासून वाटतं आपली माणसं आपला देश आपल्या मातीशी असलेली नाळ ब्रिटिश म्युझियमच्या एखाद्या प्रचंड भल्या मोठ्या वास्तू समोर थिटी पडेल . मी तिथे असतांना आपण नेहमीच एकमेकांना एखाद्या अपराधीन नजरेने बघत असू . तुला आठवतं . शेफालीचा जन्म झाला तेव्हा तू नव्हतास जवळ .