भटकंती.. (सुरुवात एका प्रवासाची ) ........ (भाग ८)

  • 6.5k
  • 2.8k

समोर एक मोठ्ठा डोंगर दिसत होता. अजूनही धुकं होतंच. तरी सूर्यप्रकाशामुळे धुकं हळूहळू विरळ होतं होते. समोरचं द्रुश्य अजूनच स्पष्ठ दिसायला लागले होते. लांबच्या लांब तो डोंगर पसरला होता. काही ठिकाणी ढग विसावले होते. मधून मधून उंचच उंच धबधबे आणि झरे ओसंडून वाहत होते. पाणी मिळेल त्या वाटेतून स्वतःला झोकून देत होते. पूर्ण डोंगर हिरव्याकंच हिरवाईने नटून गेला होता. मधूनच एखादा पक्षांचा थवा नजरेस पडत होता. नजर जाईल तिथे हिरवळ आणि झरे.... त्यात सूर्योदय होतं असल्याने पूर्ण हिरवाई आता चमकत होती. आजूबाजूने वाहणाऱ्या धुक्याने त्या सर्वांचे चेहरे आणि कपडे ओले केले होते. त्यात मधेच येणाऱ्या थंड वाऱ्याच्या झुळुकेने अंग शहरल्या