शासनानं दारूबंदी केली. गावात पिणारी मुबलक असूनबी गावानं त्याच स्वागतच केलं. शासनानं नसबंदी केली. गावातल्या बायांचा जीव भांड्यात पडला. त्यांनी त्याच बी स्वागत केलं. शासनानं उघड्यावर शौचास बंदी केली. घराघरात शौचालये बांधली गेली. हातात तांब्या घेऊन जागा शोधणारांना जरा हायस वाटलं. आता शासनानं प्लॅस्टिक पिशव्यांची बंदी केली अन बनगरवाडीत एकच गलका सुरू झाला. त्याला गावकऱ्यांची बी काय चूक नव्हती. गावाचा आज पातुर प्लॅस्टिक पिशव्या जीव की प्राण हुता.त्या दिवशी सकाळी सकाळीच गणप्यांन गावात बातमी आणली की उद्यापासन प्लॅस्टिक पिशव्या बंद होणार. ते जरा चार बुक शिकलेलं हुतं. गावातल्या बाया बापड्याना काई बी कळना. घरातील चुलीपातुर प्लॅस्टीक पिशव्या बंदीची चर्चा मातूर