ना कळले कधी Season 1 - Part 12

(17)
  • 15.4k
  • 3
  • 11.6k

सिध्दांतच्या मते चूक आर्याचीच होती आणि त्याला तर ऐकून घेण्याची सवयच नव्हती. 'आर्या, तुला वाटत नाही आहे तु थोडं जास्तच बोलतीये.', सिद्धांत तिला ओरडूनच म्हणाला, 'जास्त नाही योग्य तेच बोलत आहे. आणि का बोलू नये मी? आणि माझ्या कडून का  अपेक्षा ठेवताय तुम्ही? आपलं काहीही नातं नाही. तुम्ही आहातच कोण मला बोलणारे आणि विचारणारे??  माझ्या वर हक्क नाही आहे तुमचा!' सिद्धांत एकदम शांतच झाला. त्याला असं काही ऐकावं लागेल अस स्वप्नातही वाटलं नव्हतं, 'हो! बरोबर आहे मी कोण आहे तुझा?', 'कसं आहे ना सर, तुम्ही स्वतः भोवती एक कुंपण केलं आहे त्या कुंपणाच्या बाहेर तुम्ही कधी येतही नाही आणि कोणाला