" काय कुत्र पाळताय?"शेजारच्या, भुक्कड गोपाळरावांनी विचारल. सत्तरीच ह्डूक, म्हणून सारी कॉलनी 'राव' लावते. एकदम कंडम माणूस! कोणाचही बर न बघवणारा. सकाळी उठून याच तोंड बघितल कि दिवस खराब जातो. तोंड कशाला? परवा सकाळी मी, याला पाठमोरा पहिला, त्या दिवशी साहेबांनी उगाच झापल! तोड पाहिलं असत तर, पुण्याचा साहेब आला असता! असा नग शोधून सापडत नाही, पण मला न मागता शेजारी मिळाला. 'आम्ही कुत्र नाहीतर गाढव पाळू, तुम्हाला काय करायचय?' हे वाक्य मनात म्हणून टाकल. "हो,का? "" अहो, नका पाळू, फार त्रासदायक असत!" गोप्या काकुळती येवून म्हणाला. त्याच क्षणी कुत्र पाळायच हा निर्णय घेऊन टाकला!, खर तर बायकोनी आधीच ठरवले होते. "आमच आम्ही