१२. शेवट कि सुरुवात ? ती घराच्या आवाराचे गेट उघडून आत शिरलीे. आवाराचे गेट लोटून आत जाताच कुणाचीही नजर पडेल अशी अतिमोहक गुलाबाची फ़ुलं हवेत डुलत होती.... आवाराच्या भिंतींना लागूनच लहान लहान पान असणाऱ्या कलमांची मोठ्या मेहनतीने लागवड केलेली.... अंगणाच्या मध्यात सम्पूर्ण अंगण झाकणार इतकं विशाल बदामाचे झाडं...! जवळच थोडं दूर एका कोपऱ्यात असणारा मोगरा हि त्याचा सुगंध उधळत त्याच् अस्तित्व जपून होता.... अशीच आणखी बरीच झाडे तिथलं वारावरण प्रसन्न ठेवण्याची जबाबदारी अगदी प्रामाणिक पणे बजावत होते..... आवाराच्या गेट जवळून अगदी चार पाच पावलं चालत जाताच दारासमोर तुळशी वृन्दावन... या सर्व देखाव्यावरून शहरात कमी जागा असल्याची आणि त्यातही कमी जागा