ना कळले कधी Season 1 - Part 11

(17)
  • 15.9k
  • 2
  • 11.8k

आर्या आणि सिद्धांत निघाले, आर्याला सिद्धांतच्या आईला भेटून फार छान वाटले. 'किती छान काम करतात ना काकू. म्हणजे मला ना अशा NGO वगैरे चालवणाऱ्या महिलांचा खरचं खूप अभिमान वाटतो', आर्या म्हणाली. 'हो! तिला आवड आहे ह्या कामाची.' सिद्धांत त्याच्या आई विषयी भरभरून बोलत होता. त्यावरून आर्याला कळून चुकलं की ह्याचं सगळ्यात जास्त प्रेम ह्याच्या आईवरच आहे. इतर कोणाचा त्याने बोलतांना उल्लेखही केला नाही. आणि आर्यानेही त्याला बाकीच्या फॅमिली मेंबरबद्दल विचारलं नाही. त्याने आर्या ला घरी सोडलं आणि तो घरी आला. 'आला का आर्या ला सोडून? किती गोड मुलगी आहे ना आर्या?' सिद्धांत फक्त  हं म्हणाला. 'अरे मी तुझ्याशी बोलतीये.' 'हे