प्रलय-१० आज जलधि राज्याची राज्य सभा भरली होती . महाराज विक्रम , त्यांची काळी भिंत पाडण्याची आज्ञा , अंधभक्त , या साऱ्यांवर ती आज निर्णय होणार होता . राज्यसभेत सर्व मंत्रीगण , राज्यातील काही प्रतिष्ठित लोक , महाराज विश्वकर्मा म्हणजे रक्षक राज्याचे प्रधान , त्यांची मुलगी अन्वी , युवराज देवव्रत असे सर्व जण जमले होते . प्रधानजी जलधि राज्यात पोहोचल्यानंतर कळालेल्या गोष्टींमुळे फारच आश्चर्य चकीत झाले . अंधभक्तांची गोष्ट त्यांना भयकारक वाटली . अंधभक्तांना काळी भिंत अडवू शकत नाही म्हटल्या नंतर त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला . संशोधन शाळेत झालेला किस्सा व त्यामागे असलेला मारूत राजाचा हात ऐकून