ना कळले कधी - Season 1 - Part 10

(19)
  • 14.9k
  • 3
  • 11.6k

आर्या ला बोलून सिद्धांत ची काळजी एकदम कमी झाली. त्याही पेक्षा उद्या पासून ती ऑफिस ला येणार हे ऐकून. आणि तो निश्चित होऊन कामाला लागला. आर्याला सिद्धांतने फोन केल्याचं थोडं नवलच वाटलं पण आज काल सिद्धांतच वागणंच बदललं होत आणि तिला ते निश्चितच सुखवणारं होत.      आर्याला आज फ्रेश वाटत होतं, थोडासा अशक्तपणा होता पण गेल्या दोन दिवसांपेक्षा आज खूप बरं वाटत होतं. आणि सिद्धांतचा फोन आल्यापासून तर आणखीनच बरं वाटत होत. ती ऑफिसला निघणार इतक्यात आयुष आला, 'मी सोडणार आज ऑफिस ला तुला!', 'अरे मी जाऊ शकते', 'हो! आजच बरं वाटतय ना, खर तर.. तू आज जायलाच नको आहे