पाठलाग (भाग-२८)-शेवटचा

(92)
  • 7.9k
  • 4.2k

ज्यावेळी डिसुझा त्याचा पुर्ण फौज फ़ाटा घेऊन मायाच्या बंगल्याकडे निघाला होता त्यावेळी माया आपलं प्लॅनींग दिपकला सांगण्यात मग्न होती. ” थॉमसला जॉनीनेच मारले हे आत्तापर्यंत तु ओळखलं असशीलच. त्यानुसार प्रथम थॉमसला मारुन त्याने तुम्हाला कोंडीत पकडले. तुमची होणारी तडफड, तगमग त्याला सुखावत होती. स्टेफनीने मुर्खपणा किंबहुना हावरपणा करुन थॉमसचा इन्शोरन्स क्लेम फ़ाईल केला. इतक्या मोठ्या रकमेसाठी पुर्ण पडताळणी होतेच आणि त्यामुळे त्यांनी त्यांचा एजंट एन्क्वायरीसाठी पाठवुन दिला. आज नाही तर उद्या तपासात थॉमसचा मृत्यु हा बनाव होता हे लक्षात आले असते आणि पोलिस तुझ्यापर्यंत पोहोचले असते. त्यामुळे जॉनीने इन्शोरन्स एजंटला संपवुन माफीयाच्याच एका माणसाला मोहीते बनवुन तुमच्या घरात घुसवले. शक्य